Virat On Greatest Batsmen 
Latest

Virat On Greatest Batsmen : विराटच्या मते, ‘हे’ दोन आहेत जगातील सर्वांत महान फलंदाज

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर दिमाखदार विजय मिळवला. विराटच्या या ऐतिहासिक खेळीनंतर तो जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान अशा चर्चा सुरू असल्या तरी विराट कोहलीने आजवरच्या दोन महान फलंदाजांची नावे सांगितली आहेत. (Virat On Greatest Batsmen)

विराट गेल्या अडीच वर्षांपासून त्याच्या खराब फॉर्मशी झुंजत होता. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात विराटने ५३ चेंडूमध्ये ६ षटकार आणि ४ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ८२ धावांची खेळी केली. या खेळीने विराट कोहलीने त्याच्याबाबतच्या नकारात्मक चर्चा थांबवल्या आहेत. (Virat On Greatest Batsmen)

स्टारस्पोर्टशी बोलताना कोहलीला आजवरचा सर्वांत महान फलंदाज कोण? असा सवाल करण्यात आला होता. यावर विराटने बेधडकपणे उत्तर दिले आहे. सचिन तेंडूलकर आणि विव रिचर्डस् हे इतिहासातील सर्वांत महान फलंदाज असल्याचे विराट कोहली म्हणाला आहे. सचिन कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वांधिक धावा केल्या आहेत. विराट सामन्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला, मी स्वत:ला सर्वश्रेष्ठ फलंदाज समजत नाही. माझ्या मते, केवळ दोन फलंदाज यासाठी पात्र आहेत. एक सचिन तेंडूलकर आणि दुसरे विव रिचर्डस्. (Virat On Greatest Batsmen)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT