Latest

Virat Dance : विराट मैदानावर झाला ‘पुष्‍पा’! डान्‍सचा व्‍हायरल व्‍हिडीओ पाहिलात का?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
अल्‍लू अर्जुनच्‍या पुष्‍पा चित्रपटातील गाण्‍यांवर आतापर्यंत अनेक क्रिकेटपटू थिरकले; मग यामध्‍ये विराट कोहली कसा मागे राहणार?. वेस्‍टइंडिज विरुद्‍धच्‍या दुसर्‍या वन डे सामन्‍यावेळी क्षेत्ररक्षण करताना विराट कोहली एकदम निवांत मूडमध्‍ये दिसला. कर्णधारपद गेलं, मागील काही सामने फॉर्मही बिघडलेला तरीही सर्वांना विराटचा जुना 'ऑल इज वेल'चा अंदाज पाहिला मिळाला. तो पुष्‍पा चित्रपटातील श्रीवल्‍ली गाण्‍यावर थिरकला. (Virat Dance) याचा व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.

Virat Dance : विराटच्‍या डान्‍सचा व्‍हिडीओ व्‍हायरल

दुसर्‍या वन डे सामन्‍यात विराट कोहली मोठी धावसंख्‍या उभारु शकला नाही. भारताने वेस्‍ट इंडिजला माफकच आव्‍हान दिले होते. मात्र याचा पाठलाग करता वेस्‍इइंडिजचा संघ बॅकफूटवर गेला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्‍या आश्‍वासक कामगिरीमुळे भारताचा विजय स्‍पष्‍ट दिसून लागला. ९ बळी गेल्‍यानंतर विराट कोहली एकदम निवांत मूडमध्‍ये आला. तो आपल्‍या नेहमीच्‍या अंदाजात क्षेत्ररक्षण करताना दिसून आला. यावेळी विराट पुष्‍पा चित्रपटातील श्रीवल्‍ली गाण्‍यावर थिरकला. हा व्‍हिडीओ सध्‍या जोरदार व्‍हायरल होत आहे.

डिसेंबर २०२१मध्‍ये विराट कोहलीने टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर नवीन वादाला सुरुवात झाली. टीम इंडियातील खेळाडू तणावात असल्‍याचे दिसत होते. मात्र कर्णधारपद सोडल्‍यानंतर विराट पुन्‍हा क्रिकेटचा अधिक आनंद घेईल, असे माजी क्रिकेटपटूंनी म्‍हटलं होते. झालही तसंच. दुसर्‍या वन डे सामन्‍यात विराट पुन्‍हा आपल्‍या जुन्‍या शैलीत आला.

विराटने श्रीवल्‍ली गाण्‍यावर डान्‍स केला. यापूर्वी ऑस्‍ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्‍हिड वॉर्नर यानेही इंस्‍टाग्रामवर श्रीवल्‍ली गाण्‍यावर थिरकला होता. क्रिकेटप्रेमींना याला भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता विराटच्‍या डान्‍सलाही असाच प्रतिसाद मिळत आहे.
भारताने वेस्‍टइंडीज विरुद्‍धच्‍या वन डे मालिकेत सलग दोन सामने जिंकले आहेत. त्‍यामुळे आता टीम इंडिया तिसर्‍या
सामन्‍यासाठी संघात मोठे बदल होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT