पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) हा इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL 2022) सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे. या हंगामात आरसीबीचे नेतृत्व फाफ डू प्लेसिस (faf du plessis) करणार असून तो आपल्या कॅप्टन्सीच्या जोरावर संघाला आयपीएलचे पहिजे जेतेपद पटकावून देऊ शकेल का? याकडे सर्वांकडे लक्ष लागले आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि रन मशिन म्हणून ख्याती असलेल्या विराट कोहली (Virat Kohli) आरसीबीचे दीर्घकाळ कर्णधार राहिला. पण त्याला आपल्या नेतृत्वाखाली आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद काही मिळवता आले नाही. विराटने गेल्या हंगामात कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. आपल्या फलंदाजीवर लक्ष केंदीत करण्यासाठी त्याने संघाच्या नेतृत्वाला रामरम केला. पण विराटबाबत एक नवी माहिती समोर येत आहे. विराटला पुन्हा आरसीबीच्या कर्णधारपदाची सुत्रे दिली जाऊ शकतात, असे वृत्त आहे.
अशातच भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विनचे (R Ashwin) मोठे वक्तव्य समोर आले आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर विराट सर्वाधिक चर्चेत राहिला. प्रत्येकाला त्याला कर्णधार म्हणून पाहायचे आहे, पण विराटने सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले. त्याने दीर्घकाळ आरसीबीचे कर्णधारपद भूषवले. मात्र, आता आयपीएल २०२२ मध्ये फाफ डू प्लेसिसला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचवेळी, पुढील वर्षी विराट कोहलीला पुन्हा कर्णधार बनवले जाऊ शकते, असा विश्वास भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज अश्विनने व्यक्त केला आहे.
अश्विनने म्हणाला की, 'मला वाटतं विराट कोहली कर्णधार म्हणून गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप तणावातून गेला आहे. त्यामुळे हे वर्ष त्याच्यासाठी एक प्रकारे ब्रेक सारखे असेल. असे असले तरी आरसीबी त्याला पुढच्या मोसमात कर्णधार म्हणून नियुक्त करू शकते. मला विश्वास आहे की डु प्लेसिसची (faf du plessis) आयपीएल कारकीर्द संपुष्टात आली आहे. तो आणखी दोन-तीन वर्षे खेळू शकतो. आरसीबीने त्याला कर्णधार बनवले आहे, हा त्याचा चांगला निर्णय आहे. फाफ खूप अनुभवी आहे, त्याने स्वतः सांगितले आहे की त्याच्या कर्णधार कौशल्यात एसएस धोनीची झलक आपल्याला पाहायला मिळते.'
विराटने युएई (UAE) आणि ओमानमध्ये खेळल्या गेलेले टी २० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या टी २० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. तर गेल्या वर्षीच त्याने आयपीएल फ्रँचायझी आरसीबीचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते.
विराट कोहलीने (virat kohli) कर्णधारपद सोडल्यानंतर अखेर आरसीबीने नव्या कर्णधाराची नियुक्ती केली. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिसला आरसीबीचा नवा कर्णधार बनवण्यात आला. त्याला ७ कोटी रुपये खर्चून अरसीबी फ्रँचायझीने विकत घेतले होते.
आयपीएल २०२२ मध्ये प्रथमच माजी कर्णधार विराट कोहली नवीन कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या (faf du plessis) नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. आरसीबी संघ २७ मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. आता कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोणत्या रंगात दिसणार हे पाहावे लागेल. विराटच्या अनुभवाचा आधार डु प्लेसिस नक्कीच घेईल हे निश्चित.