(Virat Kohli In T20 World Cup) 
Latest

Virat Kohli bhajan : विराट ‘भक्‍ती’त चाहती तल्‍लीन! कोहलीवरील ‘भजन’ पाहिलंत का? ( Video )

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज, माजी कर्णधार विराट कोहलीचे चाहते जगभर आहेत. आपण किती 'ग्रेट फॅन्‍स' आहोत, हे दाखविण्‍यासाठी त्‍यांची धडपड सु असते. त्‍याचे व्‍हिडीओही सोशल मीडियावर व्‍हायरल होतात. नुकतेच आशिया चषक क्रिकेट स्‍पर्धेत विराट कोहलीने टी-२० फॉर्मेटमधील आपलं पहिले शतक झळकावले. या कामगिरीनंतर चाहत्‍यांकडून त्‍याच्‍यावर कौतुकाचा वर्षाव सुरुआहे. सोशल मीडियावर पुन्‍हा एकदा 'किंग कोहली'चा प्रभाव दिसू लागला आहे. ( Virat Kohli bhajan ) विराटच्‍या 'भक्‍ती'त तल्‍लीन होवून त्‍याच्‍यावरील भजन गातानाचा महिलेचा व्‍हिडीओ सध्‍या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

क्रिकेटपटू आणि त्‍यांचे चाहते हा एक वेगळचे समीकरण आहे. काही चाहते आपल्‍या आवडत्‍या खेळाडूला देवाप्रमाणे पूजतात. याच अंदाजातील एक व्‍हिडीओ सध्‍या सोशल मीडियात व्‍हायरल झाला आहे. यामध्‍ये एक महिला विराट कोहलीवर रचलेले भजन गाताना दिसत आहे. व्‍हिडीओ पाहिले की वाटतं की ती महिलाच भजन गातीय आणि विराट धुंवाधार फलंदाजी करताना दिसत आहे. हा व्‍हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. विराटवर चाहतीचा हा व्‍हिडीओ केव्‍हाचा, हे स्‍पष्‍ट झालेले नाही. मात्र याला एक लाखाहून अधिक जणांनी लाइक केले आहे.

मागील काही दिवस विराट कोहलीच्‍या फॉर्मबाबत सवाल केले जात होते. सुमारे तीन वर्ष विराटने शतक झळकावले नव्‍हते. मात्र अफगाणिस्‍तानविरुद्‍धच्‍या सामन्‍यात त्‍याने पुन्‍हा एकदा दमदार कमबॅक करत शतक झळकावत क्रिकेट रसिकांची मने जिंकली. यानंतर सोशल मीडियावर त्‍याचे चाहते त्‍याच्‍यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT