Latest

Virat and Gambhir Controversy : ‘विराट-गंभीर’ वादाची युपी पोलिसांनी उडवली खिल्ली! केले मजेदार ट्विट…

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सोमवारी (दि. १) झालेल्या सामन्यातील वादावादीमुळे (Virat and Gambhir Controversy) आयपीएलच्या इतिहासातील लाजिरवाणी घटना ठरली आहे. नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यामध्ये झालेल्या वादाचे रूपांतर अखेर विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर असे झाले. या वादाची उत्तर प्रदेश पोलिसांनी मात्र एक मजेशीर ट्विट करत खिल्ली उडवली आहे.

लखनौ सुपर जायंट्स आणि आरसीबी यांच्यातील सामन्याच्या शेवटच्या क्षणी विराट कोहलीची लखनौचा खेळाडू आणि अफगाणीस्तानचा क्रिकेटर नवीन-उल-हकशी बाचाबाची झाली. यानंतर कोहली आणि गौतम गंभीर (Virat and Gambhir Controversy) यांच्यात वाद झाला. या वादाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही लोकांनी तर यूपी पोलिसांना टॅग करत मैदानावरील भांडणाचे फोटो ट्विट केले होते. यूपी पोलिसांनी तोच फोटो ट्विट करून त्यांच्या वादाची एकप्रकारे खील्ली उडवली आहे.

 'आमच्यासाठी कोणतीही समस्या 'विराट' किंवा 'गंभीर' नाही'

सोशल मीडियावरील या चर्चेला विनोदी पद्धतीने घेत यूपी पोलिसांनीही ट्विट केले. 'आमच्यासाठी कोणतीही समस्या "विराट" आणि "गंभीर" नाही. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ताबडतोब 112 डायल करा' असेही आवाहन या ट्विटमध्ये करण्‍यात आले आहे. या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

विराट आणि गंभीर यांच्‍या चाहत्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेया ट्विटवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, नवीन उत्तर प्रदेशचे नवे यूपी पोलीस, तर आणखी एका अभिषेक द्विवेदी नावाच्या युजरने यूपी पोलिसांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT