Latest

Viral Video : सिंह समोर आला आणि तो ‘दगड’ झाला ! त्यानंतर काय घडलं ?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सध्‍या सोशल मीडियावर एका जंगल सफारीचा व्‍हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्‍हायरल ( Viral Video ) होत आहे. हा व्‍हिडीओ कोणाचाही थरकाप उडविणाराच ठरला आहे. या व्‍हिडीओमध्‍ये एक सिंह पर्यटकांच्‍या वाहनासमोर येतो. क्षणभर वाटतं की तो पर्यटकांवर हल्‍ला करणार;पण जंगलाचा राजा मोठ्या दिमाखात शांतपणे पुढे निघून जातो. या व्‍व्‍हिडीओचे चित्रीकरण केव्‍हा झालंय याची माहिती अद्‍याप स्‍पष्‍ट झालेली नाही. तुम्‍हाला श्‍वास रोखून धरायला लावणार्‍या हा व्‍हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील एका अभयारण्‍यातील आहे.

व्‍हायरल झालेल्‍या व्‍हिडीओमध्‍ये तुम्‍ही पाहू शकता की, काही लोक जंगल सफारीसाठी जीपमधून जात आहे. हा रस्‍ता कच्‍चा आहे. येथे दोन वाहने समोरासमोर उभी आहेत. त्‍याचवेळी वाहनात बसलेल्‍या पर्यटकांसमोर सिंह येतो. एका क्षणात सर्वांचा श्‍वास रोखला जातो. सिंह वाहनासमोर येतो तेव्‍हा वाहनाच्‍या बोनेटवर बसलेला आपला श्‍वास रोखून काही क्षण दगड झाल्‍यासारखाच बसतो. तो कोणतीही हालचाल करत नाही. सिंहही क्षणभर वाहनासमोर थकबतो आणि पुन्‍हा आपल्‍या डौलात पुढे जातो.

Viral Video : येथे जगातील सर्वात अविश्‍वसनीय खेळ पाहायला मिळतो

हा थरारक व्‍हिडीओ इंस्‍टाग्रामवर richard.degouveia नावाने शेअर करण्‍यात आला आहे. त्‍यानी कॅप्‍शनमध्‍ये म्‍हटलं आहे की, ट्रॅकर्स सीटवर तुम्‍हाला कसे वाटेल? sabi sabi reserve मधील प्राण्‍यांना अनेक पिढ्यांपासून वाहनाची सवय आहे. त्‍याच्‍या जवळपास वाहन आलं तरी ते त्‍याकडे दुर्लक्ष करतात. असे म्‍हणावं लागेल की, येथे जगातील सर्वात अविश्‍वसनीय खेळ पाहायला मिळतो.
Viral Video :

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT