Latest

Workout With Saree : साडीत केला वर्कआउट; सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओचा धुमाकुळ

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या युगातील तरुणी साडीमध्ये आपला दिवस पूर्ण करतील असं अजिबात वाटत नाही, असे आता साठीत आलेल्‍या महिला म्‍हणताना दिसतात. मात्र सध्या सोशल मीडियावर हे मत खोटे ठरवणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक तरुणी "साडी विथ वर्कआऊटचा" (Workout With Saree) संदेश देत साडीत जीममध्ये व्यायाम करताना दिसून आली. हा व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

रिना सिंग फिटनेस (reenasinghfitness) या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्‍ये तरुणीचा जीममधील व्यायाम पाहणारे अनेकजण आश्चर्य करत आहेत. जीममध्ये व्यायाम करताना सुटसुटीत कपडे वापरणे सोयीस्कर ठरते. मात्र व्हिडिओमधील तरुणी चक्क साडीमध्ये व्यायाम करत असल्याचे दिसत आहे. तिचा साडी विथ वर्कआऊट (Workout With Saree) हा संदेश आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

कमरेला पदर खोचून तरुणीने सुरु केला व्यायाम (Workout With Saree)

व्हायरल व्हिडिओत असे दिसून येते की, गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ही तरुणी कमरेला पदर खोचून ट्रॅक्टरचे टायर उचलून व्यायाम करत आहे.  ती जीममधील टेबलवरुन स्टेप्स मारत असल्याचेही दिसून येत आहे. आणखी एका व्‍हिडिमध्ये ती काळ्या रंगाच्या साडीमध्ये मोठ मोठी वजने उचलताना दिसते. साडीमधील तिने केलेला वर्कआउट हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तू शक्तीशाली आहेस, खूप भारी आहे, साडीमधील व्यायामाचा आदर्श घ्यायला हवा, तुझ्या हार्डवर्कला सलाम आहे. अशा कमेंटस युजर्स करत आहे.

व्यायामाच्या नियमांचे पालन गरजेचे

व्हायरल होत असलेल्या तरुणीच्या साडीमधील व्यायामातून एक समजते की, व्यायामाला गरज असते ती जिद्दीची आणि सातत्याची. मात्र   व्यायाम करत असताना काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. एखाद्याने केले म्हणून आपणही अगदी जसाच्या तसा व्यायाम करु हे कधी कधी जीवाशी बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला जसं सोयीस्कर आहे आणि व्यायाम करण्याचे जे नियम आहेत त्याचे पालन करा.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT