विनेश फोगाट रुग्णालयात दाखल, यामुळे अचानक घेतला मोठा निर्णय File Photo
Olympics

विनेश फोगाट रुग्णालयात दाखल, यामुळे अचानक घेतला मोठा निर्णय

पॅरिसमध्ये भारतीय स्‍टार कुस्तीपटू विनेश फोगाटची तब्येत बिघडली

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन :

पॅरिस मध्ये भारतीय स्‍टार रेसलर विनेश फोगाटची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्‍यामुळे तीला तात्‍काळ रूग्‍णालयात भरती करण्यात आले आहे. विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलसाठी अपात्र ठरल्‍याची बातमी आल्‍यानंतर ही दुसरी बातमी समाेर आली आहे.

Vinesh Phogat Hospitalized : पॅरिस ऑलिम्‍पिक २०२४ मध्ये काल (मंगळवार) विनेश फोगाटने एका पाठोपाठ एक या प्रमाणे तीन सामने जिंकले आणि थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. यामुळे संपूर्ण भारतभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अंतिम सामन्यात पोहोचल्‍याचा अर्थ होता की, भारत आणि विनेश फोगाटला पदक पक्‍के झाले होते.

आता आज (बुधवार) फक्‍त हे पदक गोल्‍ड असणार की सिल्‍व्हर इतकेच ठरणे बाकी होते. आज रात्री 12.45 च्या सुमारास विनेश फोगटचा अंतिम सामना होणार होता. मात्र त्याआधी तीचे वजन केले असता हे वजन थोडे जास्त असल्याचे दिसून आले. यानंतर ती या सामन्यातून बाहेर पडली. फाेगाटला पुढील सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले.

दरम्यान, या इव्हेंटमधून तिला अपात्र घोषित करताच विनेश फोगटला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीला निर्जलीकरणामुळे रूग्‍णालयात दाखल केल्‍याची माहिती समाेर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT