.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटला वजन जास्त असल्याने अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी विनेश फोगटला अपात्र ठरवण्याचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. फोगाटच्या अपात्रतेमुळे लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला.
भारतीय संघाने महिला कुस्तीच्या ५० किलो गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरविल्याची माहिती दिली आहे. २९ वर्षीय फोगाट हिला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले. अंतिम सामन्याच्या दिवशी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. भारतीय संघाने सर्वोत्तम प्रयत्न करूनही आज सकाळी फोगाटचे वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले.
विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "विनेश, तू चॅम्पियन्समध्ये एक चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजचा हा खूप मोठा धक्का आहे. मी ज्या निराशेचा अनुभव घेत आहे, तो शब्दात व्यक्त करू शकत नाही, असे मोदी यांनी म्हटले आहे.