satish kaushik  
Latest

Satish Kaushik Death : सतीश कौशिक मृत्‍यू प्रकरणी विकास मालूचा खुलासा, ‘माझ्‍या पत्‍नीने…’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्‍या आकस्‍मिक मृत्‍यू प्रकरणाचे  ( Satish Kaushik Death ) गूढ अद्याप कायम आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. दिल्लीतील व्यापारी विकास मालू याची पत्नी शान्वी हिने पोलीस ठाण्यात जाऊन पती विकास यानेच कौशिक यांच्‍या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक दावा केला होता.याबाबत आता विकास मालूने खुलासा केला आहे.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर विकास मालू कधीच कॅमेऱ्यासमोर आला नव्‍हता. मात्र, पत्नीच्या खळबळजनक आरोपानंतर मालू याने स्वत: च्याच पत्नी कौशिक यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे म्‍हटले आहे.  'माझे सतीश कौशिक यांच्‍यासोबत गेल्या ३० वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. यामुळे त्याच्या मृत्यूनंतर माझ्या नावाची बदनामी करायला सुरूवात झाली आहे. माझी पत्नीही यामध्‍ये आघाडीवर आहे.  मला एवढेच सांगायचे आहे की, शोकांतिका सांगून कधीच येत नाही तर ती अनपेक्षित येत असते. मी विनंती करू इच्छितो की, प्रत्येकाच्या भावनांचा आदर करावा. मला प्रत्येक उत्सवात सतीश कौशिकजींची आठवण येत राहिल.'

विकासची पत्नी शान्वी हिने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पतीने सतीश कौशिकच्या हत्येचा कट रचल्याचा दावा केला होता. यावेळी तिने सांगितले होते की, 'पंधरा कोटी रुपयांच्या कारणावरून माझ्या पतीने सतीश कौशिकची हत्या केली आहे'. सतीश कौशिक गेल्या वर्षी २३ ऑगस्ट २०२२ रोजी त्याच्या दुबईत पैसे मागण्यासाठी आले होते. परंतु त्याच्याकडे परतफेड करण्यासाठी पैसे नव्हते. या वादातून कौशिक यांची हत्या झाली असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.

याच दरम्यान विकास मालूने स्वत: च्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सतीश कौशिक गायक यो यो हनी सिंहच्या 'इंग्लिश बीट' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. पांढरा कुर्ता आणि पायजामामध्ये कौशिक खूप आनंदी दिसत आहेत; परंतु हे त्याच्या आयुष्यातील शेवटचा डान्स असेल याची कोणालाच कल्पना नव्हती. या व्हिडिओत सतीश कौशिक यांच्यासह विकास मालू आणि इतर लोकही आजूबाजूला उपस्थित असल्याचे दिसतेय. हा व्हिडिओ दिल्लीत झालेल्या होळी पार्टीचा आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमधून विकास पत्नीवर आरोप केले आहेत.

सतीश कौशिक यांचे ९ मार्च २०२३ रोजी दिल्लीतील पुष्पांजली फार्म हाऊसमध्ये निधन झाले. मुंबईतील होळीच्या पार्टीनंतर ते दिल्लीच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते. या पार्टीदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यत त्याचा मृत्यू झाला होता. ( Satish Kaushik Death )

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT