Latest

Singer Vani Jayaram Passed Away : ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे निधन

अमृता चौगुले

चेन्नई; पुढारी ऑनलाईन : साऊथच्या प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे शनिवारी (दि.4) चेन्नई येथील राहत्या घरात निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. गायिका म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत नुकतेच ५० वर्षे पुर्ण केली होती. त्यांनी १८ भाषांमधून तब्बल १0 हजार गीते गायली आहेत. त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतले 'हमको मन की शक्ती देना' हे १९७१ साली आलेल्या 'गुड्डी' या चित्रपटातील गीत आजही अनेक भारतीयांच्या तोंडी रुजले आहे. अनेक ठिकाणी प्रार्थना म्हणून हे गीत म्हटले जाते. (Singer Vani Jayaram Passed Away)

वाणी जयराम यांना तीन वेळा राष्ट्रीय पारितोषक देऊन गौरविण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी २६ जानेवारी २०२३ रोजी केंद्र सरकाकडून त्यांना पद्मभूषण पुरस्काराची घोषणा केली होती. त्यांच्या मृत्यूने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. (Singer Vani Jayaram Passed Away)

वाणी जयराम यांनी विविध सिनेसृष्टीतील मोठ्या संगीतकारांसोबत काम केले आहे आणि सदाबहार गिते दिले आहेत. त्यांनी एम.एस. इलाईराजा, आर.डी. बर्मन, के.व्ही. महादेवन, ओ.पी. नय्यर आणि मदन मोहन यांच्यासह इतर प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केले आहे. त्यांनी तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी, तुळू आणि उडिया भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यांना तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि ओडिशा सरकारकडून राज्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. (Singer Vani Jayaram Passed Away)

चेन्नई येथील घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्या एकट्याच रहात होत्या. जेव्हा त्यांचा मृतदेह आढळला तेव्हा त्यांच्या कपाळावर जखम आढळून आली. सध्या शवविच्छेदानासाठी त्यांचा मृतदेह पाठविण्यात आला असून त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत पोलिसांनी अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT