पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. दोघांनीही एकमेकांना टोमणे मारण्याची एकही संधी सोडलेली नाही. पण, आता प्रकरणात उर्वशीचा सूर बदलताना दिसत आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत ती ऋषभ पंतची माफी मागताना दिसत आहे. माफी मागतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. (Urvashi Rautela)
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी चर्चेत असते. ती कधी भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत तर कधी पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाह यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून चर्चेत असते. सध्या ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात वाद सुरू आहे. परंतु, आता उर्वशीने ऋषभ पंतबद्दल असे काही बोलले आहे की त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
उर्वशीने मागितली ऋषभची माफी
काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतला 'छोटू भैया' असे संबोधले होते. उर्वशीने ऋषभ पंतबद्दलच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'छोटू भैय्याने बॅट बॉल खेळावा, मी मुन्नी नाही, की जी तुमच्यासाठी बदनाम होईल. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. ही उर्वशीची पोस्ट व्हायरल झाली होती. आता उर्वशीने हात जोडून ऋषभ पंतची माफी मागितली आहे.
रिषभ पंतसोबत सोशल मीडियावर झालेल्या वादानंतर उर्वशीने एका मुलाखती दरम्यान रिषभची माफी मागितली. मुलाखतींमध्ये तिला विचारण्यात आले की, तिला रिषभला काही संदेश द्यायचा आहे का? यावर प्रश्नाला हात जोडून उत्तर देत रिषभ पंतची माफी मागितली.
रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात वादाची ठिणगी कशी पडली
उर्वशी रौतेलाच्या मुलाखतीनंतरच दोघांमधील वादाला सुरूवात झाली. उर्वशीने एका मुलाखतीत रिषभ पंतवर टीका करताना म्हणाली होती की, एका व्यक्तीने हॉटेलच्या लॉबीमध्ये 10 तास त्याची वाट पाहिली होती. उर्वशीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेटर रिषभ पंतने तिला टोमणे मारणारी एक इन्स्टा स्टोरी टाकली होती. रिषभ पंतने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये नाव न घेता उर्वशीवर टीका केली होती. मात्र, काही काळानंतर रिषभने इन्स्टा स्टोरी पोस्ट केल्यानंतर लगेचच ती डिलीट केली.
रिषभ पंतच्या ही पोस्ट पाहून उर्वशीही गप्प बसली नाही. तिने तिच्या स्टाईलमध्ये एक पोस्ट शेअर करत रिषभला प्रत्युत्तर दिले. तिने रिषभ पंतला छोटू भैया म्हणत बदला घेतला होता. मात्र आता उर्वशीने रिषभ पंतची माफी मागत या वादावर पडदा टाकला आहे. उर्वशी रौतेलाने मागितलेल्या माफीवर रिषभ पंत काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे आता महत्वाचे आहे.
हेही वाचा;