अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar )यांना करोनाची लागण झाली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. कोव्हिडची काही लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांनी तातडीने करोना चाचणी केली. त्यांची काेराेना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. चाचणी अहवाल आल्यानंतर उर्मिला क्वारंटाइन झाल्या असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
मातोंडकर यांनी ट्विट करून म्हटले आहे, 'मी कोव्हिडची टेस्ट केली होती जी पॉझिटिव्ह आलीय. माझी प्रकृती ठीक असून, मी स्वत:ला होम क्वारटांइन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने त्वरित करोना चाचणी करुन घ्यावी ही विनंती.'
उर्मिलाच्या ( Urmila Matondkar ) या ट्वीटवर त्यांच्या चाहत्यांनी उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या कमी आली असली तरी पूर्णपणे ती कमी झालेली नाही. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आईलाही कोरोना संसर्ग झाला होता.
हेही वाचलं का ?