मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'बिग बॉस ओटीटी'मध्ये आपल्या अदांनी हंगामा करणारी आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. सध्या तिचे निळ्या रंगाच्या बिकिनीतील फोटो ( urfi javed bikini photo ) सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहेत.
नुकतेच उर्फी जावेद यांनी आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर निळ्या रंगाच्या बिकिनीतील ( urfi javed bikini photo ) काही बोल्ड, हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत उर्फी निसर्गरम्य ठिकाणी असून तिने आपल्या केसांना हात लावत पोझ दिली आहे. . हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने 'Always a beach baby…' दिली आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काहींनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. तर काही युजर्संनी तिला तिच्या तोकडया कपड्यांवरून सुनावले आहे. याशिवाय काही युजर्सनी तिला असे कपडे न घालण्याचा सल्ला दिला आहे.
याच दरम्याम आणखी एका युजर्सने भारतात 'हिवाळा सुरू झाला काय?', तर 'अब बचा क्या है, ये भी उतार दो…' अशी कॉमेंन्टस केल्या आहेत. याआधीही उर्फीने वेगवेगळ्या बिकिनीतील काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी देखील तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
याशिवाय उर्फीने नुकतेच इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने फ्लोरल प्रिंट बॅकलेस ब्रालेट शॉट टॉप आणि पांढऱ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. याशिवाय तिने केसांची पोनीदेखील बांधली आहे. यातील खास म्हणजे, डान्स स्टेप करताना उर्फीच्या कमरेवरील एक टॅटू दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी चांगल्या आणि वाईट कॉमेन्टस केल्या आहेत. यात एकाने 'सर्वात वाईट डान्स'. तर दुसऱ्याने 'माणुसकीच्या सर्व हद्दपार केल्या आहेस'. असे लिहिले आहे.
उर्फीने 'सात फेरी की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जीजी मां', 'डायन', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी' सारख्या मालिकेत काम केले आहे. यानंतर ती बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली. बिग बॉसनंतर ती खूपच प्रकाश झोतात आली आणि तिचा फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे.
हेही वाचलंत का?