पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या पावसात भिजण्याचा आनंद घेत फॅशन आयकॉन उर्फी जावेद हिने व्हिडिओ अपलोड केला आहे. (Urfi Javed video) पावसात भिजत आनंदाने नाचत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. (Urfi Javed video) हातात पिवळ्या रंगाची छत्री घेत उर्फीने हा व्हिडिओ बनवला आहे. उर्फी नेहमीच तिच्या हटक्या फॅशनसाठी ओळखली जाते. तिने आतापर्यंत जितके फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यामध्ये तिच्या फॅशनची खूप चर्चा रंगते. आताही तिने हटक व्हिडिओ केला आहे.
उर्फीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती इमारतीच्या छतावर दिसते. सुरुवातीला वेगळ्या पेहरावात दिसते. नंतर साडीमध्ये दिसते. फ्लोरल साडी नेसून ती छत्री घेऊन डान्स करताना दिसते. या व्हिडिओत तिची साडी आणि ब्लाऊज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. डान्स करताना मोकळे ओले केस दिसत आहेत. शिवाय ती आपली वेस्ट फ्लॉन्ट करतानाही दिसते आहे. पिंक कलरच्या साडीत तिने सर्वांना मोहून टाकले आहे.
दरम्यान, उर्फी जावेदचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने असा ड्रेस घातला आहे ज्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने पीच कलरचा ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस बाजूने कापला जातो जो लेसेसने बांधला जातो. उर्फीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी पोनीटेल आणि हिल्स घातल्या आहेत. उर्फीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक तिला खूप ट्रोल करत आहेत. तिच्या ड्रेसवर लोक खूप कमेंट करत आहेत.
उर्फी जावेदला ड्रेसमुळे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिला तिच्या अनेक ड्रेसमुळे ट्रोल करण्यात आले आहे. अलीकडेच तिने काचेचा बनवलेला ड्रेस घातला होता. त्यामुळे ती जखमीही झाली होती.
उर्फी जावेद इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. उर्फीने एक मालिकाही केली आहे. नुकतीच ती बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती.
video : instantbollywood insta वरून साभार