subhedar movie 
Latest

Subhedar : स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा सुभेदार यादिवशी भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. (Subhedar) स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या नेत्रदीपक कर्तृत्वाने शिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा शूरवीर योद्ध्यांनी आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रेरित केले आहे. (Subhedar)

"आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच" म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! तान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही. पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. 'सुभेदार' हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद..त्यांच्या अतुलनीय शौर्या बरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा भव्य ऐतिहासिक चित्रपट म्हणजे 'सुभेदार'!

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या 'सुभेदार' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'पहिला मानाचा मुजरा' असं म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टीझरमधून अतुल्य शौर्याची झलक पहायला मिळतेय. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला 'सुभेदार' चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकणार आहे. 'शिवराज अष्टक'मधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर 'सुभेदार' या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या 'सुभेदार' चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे 'सुभेदार' चित्रपटाचे निर्माते आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT