पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या अभिनयासोबत चांगल्या आईच्या जबाबदारी पार पाडत आहे. प्रियांकाने मुलगी मालतीची काळजी घेण्यापासून ते तिचे इंस्टाग्रामवर गोंडस फोटो शेअर करण्यापर्यत चाहत्यांना सर्व अपडेटस देत असते. सध्या आणखी एकदा प्रियांकाचे मालतीसोबतचे गोंडस आणि न पाहिलेला फोटो समोर आले आहेत.
नुकतीच प्रियांकाची जवळची मैत्रीण तमन्ना दत्तने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रियांका चोप्रा, तिची मुलगी मालती आणि गायक निक जोनास दिसत आहेत. प्रियांकाच्या कुटुंबासोबतचा न पाहिलेला फोटो सोशल मीडियावर पहिल्यांदा पोस्ट करण्यात आला आहे. यात प्रियांकाच्या हातात क्यूट मालती आणि शेजारी उभारून निक दोघींकडे एकटक पाहाताना हटके दिसतोय. यावेळी मालतीचा चेहऱ्या आधीप्रमाणेच लपविला असून ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. याशिवाय आणखी एका फोटोत मालती प्रियांका आणि तमन्ना तिघींजणी हटके अंदाजात पाहायला मिळाल्या. यावेळी तिघींनीही एकसारखेच रेड रंगाच्या ड्रेस परिधान केलाय.
याआधी प्रियांकाने ( Priyanka Chopra ) मालतीसोबतचे काही फोटो शेअर केले होते. परंतु, या फोटोत तिने मालतीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता. पहिल्या फोटोत मालती तिच्या गोंडस चित्रांच्या पुस्तकात व्यस्त असल्याचे तर दुसऱ्या फोटोत तिच्या पलंगावर आरामात झोपलेली दिसतेय. यावेळी मालतीने स्ट्रॅपी ड्रेस घातला आहे. प्रियांकाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'माझी सर्व मुले. परफेक्ट संडे.' असे लिहिले आहे. यावरून प्रत्येक फोटोत मालतीचा चेहरा दिसत नाही परंतु, ती खूपच क्यूट असल्याचे समजते.
प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी लग्न केले. यानंतर या जोडप्याने सरोगसीच्या माध्यमातून त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. या मुलीचा नाव त्यांनी मालती मेरी चोप्रा जोनास असे ठेवले. जन्मानंतर मालतीला १०० दिवस एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता मालती फिट अँड फाईन आहे.
हेही वाचा