नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : जी- 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने एकत्र येत भारताने ऑस्ट्रेलियाशी असणारे मैत्री संबध अधिक दृढ केले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही नव्याने मोठ्या होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. दोन्ही देश परस्परातील व्यापार वाढीस प्रोत्साहन देत आपल्या अर्थव्यवस्थांना मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. दोन्ही देशांनी एकत्र येत ३० अब्ज डॉलरचा व्यापार करारावर असंतुष्ट असल्याचे सांगत, पुढील पाच वर्षात १०० अब्ज डॉलरपर्यंत दोन्ही देशातील व्यापार वृद्धीचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी दिली. (Trade Between Australia & India)
जी – 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲन्थनी अल्बानीज भारत दौऱ्यावर आले आहेत. शिखर परिषदे दरम्यान दोन्ही देशांमध्ये इंडो फॅसिफिक इकोनॉमीक फ्रेमवर्क, डब्ल्युटीओ, क्वाड सारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान दोन्ही देशांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ऑस्ट्रेलियाचे व्यापर व पर्यटन मंत्री डॉन फॅरेल यांच्याशी व्यापार वृद्धीसंदर्भात चर्चा करण्यात आली. (Trade Between Australia & India)
मंत्री पियूष गोयल यांनी दोन्ही देशांच्या मंत्रीस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांची संवाद साधताना म्हणाले की, भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान असणाऱ्या ३० अब्ज डॉलर व्यापारावर दोन्ही देश असंतुष्ट आहेत. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढत आहे. दरम्यान दोन्ही देशातील व्यापार वृद्धी ४० ते ५० अब्ज डॉलर पर्यंत वाढण्याचे लक्ष अधिकारी वर्गाने ठेवले आहे. पण, पुढील पाच वर्षांसाठी भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान १०० अब्ज डॉलरच्या व्यापाराचे उद्दिष्ट दोन्ही देशांनी ठेवल्याचे यावेळी मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
अधिक वाचा :