कागल : हसन मुश्रीफ यांच्या निवासस्‍थानी ईडीचा छापा; कार्यकर्त्यांची गर्दी, पोलिसांची नाकाबंदी | पुढारी

कागल : हसन मुश्रीफ यांच्या निवासस्‍थानी ईडीचा छापा; कार्यकर्त्यांची गर्दी, पोलिसांची नाकाबंदी

कागल ; पुढारी वृत्‍तसेवा हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापा पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते निवासस्थानाकडे येऊ लागले आहेत. कागल शहरातील मुश्रीफ यांच्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व रस्ते स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी करून रोखले आहेत. तसेच विशेष पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गैबी चौकातून मुश्रीफ यांच्या घराकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आल्याने निवासस्थानाकडे येणारे कार्यकर्ते गैबी चौकात रोखण्यात आले आले आहेत.

या चौकामध्ये देखील प्रचंड गर्दी झाली असून, कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत आहे. कागल तालुक्यातील कार्यकर्ते मुश्रीफ यांच्या निवासस्थानाकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची गर्दी कायम होती. पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये सतत बाचाबाची होत आहे.

दरम्यान सागर दावणे या तरुणाने डोके आपटून घेऊन ईडीच्या कारवाईचा निषेध केला. यावेळी तो रक्तबंबाळ झाल्याने त्‍याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना केळीचे वाटप केले जात होते. जिल्ह्यातील आणि तालुक्यातील नेतेमंडळी निवासस्थाना समोर दाखल झाले आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून कार्यकर्ते निवासस्थानासमोर ठाण मांडून होते. महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्‍या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button