Union Minister Nitin Gadkari & Ujjain MP Anil Firojiya  
Latest

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींचे बोलणे उज्जैनच्या खासदारांनी घेतले मनावर; १५ किलो वजन केले कमी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे फेब्रुवारीमध्ये उज्जैनच्या दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमात विकासकामांच्या घोषणांदरम्यान त्यांनी येथील एका खासदारांना आरोग्याबाबत सल्लाही देत एक आव्हानही दिले होते. गडकरींनी ​​खासदार अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्याचा सल्ला देत एक आव्हानही दिले होते.

मध्य प्रदेशातील उज्जैन लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल फिरोजिया सध्या चर्चेत आहेत. खासदार फिरोजिया यांना मतदार संघातील विकासकामांसाठी त्यांच्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे १००० कोटी रुपये देण्याचे वचन मंत्री गडकरी यांनी दिले होते. गडकरींचे हेच आव्हान स्विकारत या खासदाराने चक्क ४ महिन्यात १५ किलो वजन कमी केले आहे.

मध्यप्रदेशातील उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामासाठी गडकरींचे आव्हान स्विकारत जवळपास १५ किलो वजन कमी केले. मी गडकरींना दिलेल्या शब्दामुळे माझे 15 किलोने वजन कमी केले आहे. "मी जगातील सर्वात महागडा खासदार आहे", असे म्हणत खासदार अनिल फिरोजिया यांनी याची आठवण केंद्रीय मंत्री गडकरींना करून दिली आहे.

फिरोजिया यांनी दावा केला आहे की, त्यांनी १५ किलो वजन कमी केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील विकासकामासाठी १५ हजार कोटी रुपयांची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT