Uncategorized

जालना : मराठा आरक्षणा संदर्भातील मागण्या पूर्ण करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वालिया न. शिकलगार

वडीगोद्री (जि. जालना) : पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणासाठी भांबेरी येथे उपोषणाला बसलेल्या आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण केल्‍या जातील, अशी ग्‍वाही देत  रविवार, १४ ऑगस्ट रोजी भांबेरीतील शिष्टमंडळाची मुंबई येथील अतिथीगृह येथे बैठक घेण्‍यात येईल. यासाठी शिष्टमंडळाने यावे, असे निमंत्रणदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिले.

बेमुदत उपोषणात अर्जुन खोतकर यांनी मध्यस्थी केली आहे. बैठकीसाठी भांबेरी येथील शिष्टमंडळ गेल्यानंतर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला.

जिल्हाधिकारी यांची उपोषणस्थळी भेट; जरांगे यांना लावली सलाईन

मागण्या‌संदर्भात सह्याद्री अतिथीग्रह मुंबई या ठिकाणी १४ ऑगस्ट रोजी चर्चेचे निमंत्रण दिले. मनोज जरांगे-पाटील यांना सलाईन लावण्याची विनंती केली. ती त्‍यांनी मान्‍य केली.

जिल्हाधिकारी जालना डॉ. विजय राठोड हे भांबेरीला आल्यानंतर सलाईन लावण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर केजभट, विष्णू केजभट, दीपक ठोंबरे, विक्रम कनके यांनी उपोषण सोडले आहे. यावेळी अंबड तहसीलदार विद्याचरण कडवकर, पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT