Uncategorized

औरंगाबाद : दारूच्या वादातून तरूणाचा खून

निलेश पोतदार

औरंगाबाद; पुढारी वृत्‍तसेवा : कांचनवाडी येथे निर्मनुष्य ठिकाणी दारू पित बसलेल्या दोन मित्रांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला करून तरूणाचा खून करण्यात आला. रविवारी मध्यरात्री ही घटना समोर आली. तरूणाचा खून झाल्‍याचे समजताच परिसरात खळबळ उडाली आहे.

महेश दिगंबर काकडे (वय १८, रा. नक्षत्रपार्क, कांचनवाडी) मृत तरुणाचे नाव आहे. महेशला जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती त्याच्या वडिलांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला त्‍यांनी घाटी रूग्‍णालयात दाखल केले.

महेश हा एका खासगी कंपनीत काम करत असल्याची प्राथमिक माहिती यावेळी मिळाली. रात्री उशिरापर्यंत या घटनेसंदर्भात पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती. तरूणाचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT