पैठण (औरंगाबाद), पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील बंद असलेले संत ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनर्जीवन करणार असून महिलांसाठी सुसज्ज पैठणी साडी क्लस्टर व उपजिल्हा रुग्णालय या महत्त्वपूर्ण योजना पुन्हा सुरू होणार आहेत. याबाबतची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि.१२) पैठण येथे करणार आहेत , अशी माहिती राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठण तालुका मतदार संघासाठी योगदान दिले असून पैठण तालुक्यातील विविध विकासाच्या योजना सुरू केल्या जाणार आहेत. कमी कालावधीमध्ये तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देणारे मुख्यमंत्री यांचा नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी (दि.१२) दुपारी दोनच्या सुमारास कावसानकर स्टेडियमवर हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संत एकनाथ महाराज मंदिरात समाधी दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरातील येथील कामाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती संदीपान भूमरे यांनी दिली.
हेही वाचा