टाकळी हाजी येथील घरफोडीचे सत्र थांबेना, घर फोडून मौल्यवान वस्तूंसह रोख रक्कम लंपास | पुढारी

टाकळी हाजी येथील घरफोडीचे सत्र थांबेना, घर फोडून मौल्यवान वस्तूंसह रोख रक्कम लंपास

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. १०) मध्यरात्री देवराम शिंदे यांचे टाकळी हाजी- वडनेर रोडवरील शिंदेवस्ती येथील घर फोडून चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तुंसह रोख रक्कम लंपास केली आहे. शिंदे हे मुलांकडे पुण्याला गेले होते. घरी कुणीच नव्हते, याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट तोडून एलसीडी टीव्ही तसेच कपाटातील रोख रक्कम लंपास करण्यात करण्यात आली आहे.

घरी कुणीच नसल्याने कपाटातील कपडे आणि घरातील साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त करून टाकले आहे. सकाळी घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने बाळू शिंदे यांनी माजी सरपंच दामुशेठ घोडे यांना कल्पना दिली. त्यांनी ताबडतोब तेथे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व याबाबत शिंदे यांच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना कळविले. सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस अंमलदार दिपक पवार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.

शिंदे यांचे कुटुंबीय पुण्यात असल्यामुळे ते आल्यानंतरच नक्की किती रक्कम आणि साहित्य चोरी गेले आहे हे समजू शकेल. यापूर्वी ही या भागात दुकानांची चोरी, घरफोडी असे प्रकार घडलेले आहेत. त्याचा तपास अजून लागला नाही, तोच हा प्रकार घडला असल्याने चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच शरदवाडी येथून एक दुचाकी गाडी आणि आमदाबाद येथून एक कृषी पंपाचीही चोरी झाली आहे.

Back to top button