Uncategorized

Police Patil Reservation : नाशिकच्या दिंडोरी-पेठ तालुक्यांतील पोलिसपाटील आरक्षण जाहीर

गणेश सोनवणे

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा   

दिंडोरी व पेठ तालुक्यांतील पोलिसपाटील संवर्गातील एकूण २९३ मंजूर पदांपैकी ११७ पदे कार्यरत असून, एकूण ११६ रिक्त पदे भरण्याचे निश्चित केल्याने 116 गावांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दिंडोरी पंचायत समितीमध्ये उपविभागीय अधिकारी आप्पा शिंदे, तहसीलदार पंकज पवार, पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. (Police Patil Reservation)

दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जमाती ३५, महिला १२ अशा एकूण 47 जागांवर आरक्षण आहे, तर सर्वसाधारणसाठी ९ जागा आहेत. पेठ तालुक्यातील ४० गावे अनुसूचित जमाती, २० गावे महिला अनुसूचित जमातींसाठी आरक्षित झाली आहेत.

संबधित बातम्या :

दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जमातींसाठी आरक्षित गावे पुढीलप्रमाणे : निळवंडी, जानोरी, पिंपळगाव केतकी, आंबेदिंडोरी, गणेशगाव, कुर्णोली, धामणवाडी, संगमनेर, बोलदरी, पांडाणे, फोफळवाडी, जुने धागूर, देहरेवाडी, वाघाड, तिल्लोळी, विळवंडी, पिंगळवाडी, वाघदेव पाडा, माळेगाव काजी, करंजाळी, टिटवे, वांजुळे, लोखंडेवाडी, साद्राळे, तळ्याचा पाडा, मोखनल, देवपूर, भनवड, बोरवण, वनारे, ठेपणवाडी, नळवाड पाडा, नळवाडी, सावर पाडा.

महिला : वारे, चंडीकापूर, पिंप्री अंचला.

दिंडोरी तालुक्यातील सर्वसाधारण गावे : लखमापूर (अनुसूचित जमाती महिला), ओझरखेड (अनुसूचित जमाती), परमोरी (विभक्त जमाती), लोखंडेवाडी (इतर मागास प्रवर्ग), आक्राळे (आर्थिक दुर्बल), वनारवाडी (महिला), मातेरेवाडी, जोपूळ, सोनजांब (सर्वसाधारण).

पेठ तालुक्यातील अनुसूचित जमातींसाठी राखीव जागा : कोटंबी, हनुमंत पाडा, कायरे (साड पाडा), काळुणे, खडकी शिगाळी, तोंडवळ, आंबापान, बेडमाळ, आंबापूर, खंबाळ, बेल पाडा, बोर पाडा, कहांडोळ पाडा, जळे, कोपुर्ली बु., सुरगाणे, डोमखडक, बोरथा, जोगमोडी, पिंपळ पाडा, फणस पाडा बु., आमडोंगरा, विरमाळ, पळसी खुद, बर्डा पाडा, चिकाडी-नाचलोंढी, देवीचामाळ, वाजवड-नाचलोंढी, डोरमाळ, गांगोडबारी, माणकापूर, मुरूमटी, घोटविहीर, ससुणे, कुळवंडी, उंबर पाडा, मानकापूर, डोंगरशेत, आमलोन, नाचलोंढी, अभेटी, जालखेड.

पेठ तालुक्यातील अनुसूचित जमाती महिला : उंबरपाडा, सावर्णा, गारमाळ, जांबविहीर, बिलकस, आसरबारी, तोरणमाळ, गांडोळे, भातविहीर, मोहपाडा, कोपुर्ली खु., फणस पाडा पा.

दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जमाती महिला : कोहोर, उंबर पाडा क, पिंपळवटी, चोळमुख, वाघेचीबारी, धूळघाट, घनशेत, रायतळे, खतवड, गवळवाडी, कोहटी, माळेदुमाला, उमराळे खुर्द, नवे धागूर, खेडले, निगडोळ, महाजे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT