पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण पोलिसांनी नाकाबंदीच्या दरम्यान तीन गांजा तस्काराकडून ४० किलो गांजासह सात लाख ४६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिमीनुसार, पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित्त गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल ,नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रोजी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान नाकाबंदी सुरू होती. औरंगाबाद मार्गावरून येणाऱ्या मारुती कार क्रमांक एम. एस.१२ एच.एफ ७६२९ या कारला थांबवून पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, अरविंद गटकुळ, सुधाकर चव्हाण, पोलिस जमादार माळी, चव्हाण, केदारे, मनोज वैद्य, आगलावे, शिंदे या पोलिस पथकाने झडती घेतली .
या कार मधील पोपट गोवर्धन नागवडे रा दिगी, प्रल्हाद गोविंद घाटे रा.गळनिंब, संदीप दगडू हिवाळे रा. गळनिंब ता.नेवासा जि. अहमदनगर यांनी गैरमार्गाने विक्री साठी तस्करी करीत असलेल्या ४० किलो ५०० ग्राम हा २ लाख १ हजार ७५० व किंमतीचा गांजा आढळून आल्यामुळे पोलिसांनी कारसह एकूण ७ लाख ४६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण हे करीत आहे.
हे ही वाचलं का