Uncategorized

Nagar News : खंडपीठाची जिल्हाधिकार्‍यांना नोटीस

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील भोरवाडी येथील अवैध क्रेशर व खाणप्रकरणी सुनावणी घेऊनही एक महिन्यात निकाल न दिल्याने छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. जी. अवचट व न्यायमूर्ती नीरज पी. धोटे यांनी जिल्हाधिकार्‍यांना नोटीस काढली आहे. पुढील सुनावणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे.

भोरवाडीतील अवैध स्टोन क्रेशर व खाणीबाबत देवराम भोर व इतर शेतकर्‍यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन शेतकर्‍यांनी दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन, महिनाभरात निकाल देण्याचे आदेश खंडपीठाने जिल्हाधिकारी यांना दिले होते.

त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी हरकतींवर सुनावणी घेतली. मात्र, महिनाभरात निकाल न दिल्याने या शेतकर्‍यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने जिल्हाधिकारी यांना नोटीस काएली आहे. पुढील सुनावणी 18 डिसेंबरला होणार आहे. याचिकाकर्ते देवराम भोर व इतर शेतकरी, ग्रामस्थ यांच्या वतीने अ‍ॅड. उमाकांत वाघ यांनी काम पाहिले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT