Uncategorized

Marriage In Paithan : टाळ मृदुंगाच्या तालावर नवरदेवाची लग्न मंडपात एंट्री!

backup backup

पैठण; पुढारी वृत्तसेवा : लग्न म्हटल्यानंतर नवरदेवाच्या रुबाबदार वरातीच्या घोड्यासमोर "आज मेरे यार की शादी है" यासह विविध गाणी ऐकायला मिळतात. यासह ढोली-बाजासह अन्य काही नवीन वाद्य आणि डीजे हे लग्न सोहळ्यातील वरातीचे मुख्य आकर्षण असते. लग्न सोहळ्यातील मुख्य भाग असलेल्या या नव्या पद्धतींना तरुणांची सर्वाधिक पसंती असते. त्यामुळे नवरदेवाच्या वरातीला लग्नातील यजमान मंडळी मोठा खर्च करून वेगवेगळ्या स्वरूपाचे वाद्य लावतात. परंतु या सर्व गोष्टीला फाटा देऊन पैठण येथील एका मामाने आपल्या भाच्याच्या लग्नामध्ये वेगळीच पद्धत रुढ केली आहे. नवरदेवाच्या वरातीपुढे "नवरदेवाची पावली चालती लग्न मंडपात" असे म्हणत टाळ मृदंगाच्या वाद्यांनी ताल धरला. (Marriage In Paithan)

या लग्न सोहळ्या बाबतची अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्तात्रय गोंर्डे याचे भाचे व विक्रम मोहनराव गरड (रा. बालमटाकळी ता. शेवगाव) यांचे चिरंजीव राहुल यांचा विवाह एकनाथ पाटील (रा. दिन्नापूर ता. पैठण) यांची कन्या पूजा यांचा लग्नसोहळा पार पडला. हा सोहळा शनिवारी (दि.१७) दुपारी पैठण शहरातील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या लग्न सोहळ्यासाठी विविध नामवंत वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी तसेच नातेवाईक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिले होते. (Marriage In Paithan)

नवरदेवाची आगळीवेगळी एंट्री

लग्न मुहूर्ताच्या काही घटकापूर्वी लग्न सोहळ्यासाठी नवरदेवाची वरात सजलेल्या घोड्यावरुन काढण्यात आली. नेहमी नवरदेवाच्या समोर मोठ्या आवाजातील डीजे व ढोलीबाजा वाजंत्री लावतात. मात्र या लग्न सोहळ्यात नवरदेवाची आगळीवेगळी अशी एंट्री पहायला मिळाली. ढोली-बाजा आणि डिजे न लावता वारकरी संप्रदायातील भजनातील बोल म्हणत नवरदेवाची लग्न मंडपात एंट्री केली.

लग्नातील नवरदेवाच्या वराती पुढे अन्य वाद्याचा वापर न करिता टाळ मृदंगाच्या तालावर नवरदेवाची वरात लग्न मंडपात केली. तसेच फुगडी हा खेळ देखील या वरातीत पहायला मिळाला. हा नवा आदर्श निर्माण केल्यामुळे हा लग्न सोहळा पैठणनगरीतील चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT