Uncategorized

Banda : बांद्यात ८१ हजारांची दारू; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

backup backup

बांदा; पुढारी वृत्तेसवा : गोव्यातून सरमळे येथे केल्या जाणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा (Banda) पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८१ हजार रूपयांचा दारूसह सुमारे अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी डिट्टो तंगचद (रा. एर्नाकुलम केरळ, सध्या रा. सरमळे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली जीप (केएल ०१ के २९९०) ताब्यात घेण्यात आली. बांदा (Banda) पत्रादेवी सीमेवरील दत्तमंदीर येथे बुधवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात केल्या जाणार्‍या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलीस सीमेवर नजर ठेवून आहेत. बुधवारी मध्यरात्री ११.३० च्या सुमारास पत्रादेवी दत्तमंदिरकडे बांद्याकडे येणारी जीप तपासणीसाठी थांबवण्यात आली.

तपासणीदरम्यान जिपमध्ये वरच्या बाजूस चोरकप्पा बनविल्याचे निदर्शनास आले. या चोरकप्प्यात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या भरण्यात आल्या होत्या. तसेच डॅश बोर्डमध्येसुद्धा दारूच्या बाटल्या सापडून आल्या. यामध्ये ८१ हजार किंमतीचे एकूण २१ बॉक्स आढळून आले. ही कारवाई बांदा पोलीस शिपाई प्रथमेश पवार यांनी केली.

पहा व्हिडीओ : आर. आर. तात्यांनी दिला आबांच्या आठवणींना उजाळा

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT