Uncategorized

दहा महिन्यांत 30 लाखांहून अधिकांना रोजगार

Shambhuraj Pachindre

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मागील दहा महिन्यांत जवळपास 30 लाखांहून अधिक जणांना रोजगार मिळाले आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) वतीने जारी केलेल्या आकडेवारी ही माहिती समोर आली आहे.

नोहेंबर 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत योजनेला सुरुवात झाली होती. आत्मनिर्भर भारत योजनेची सुरुवात झाल्यानंतर वर्षभरात जवळपास 3.29 दशलक्ष लोकांसाठी रोजगार निर्मिती झाली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या अखेरपर्यंत म्हणजेच 31 मार्च 2022 पर्यंत केंद्र सरकारने 5.85 दशलक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवले आहे. यानुसार येत्या सहा महिन्यात 2.56 मिलियन रोजगाराची निर्मिती करणे गरजेचे आहे.

एकूण रोजगारापैकी 2.88 दशलक्ष नवीन कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तर 0.41 दशलक्ष पुन्हा लाभार्थी आहेत. सप्टेंबर 2021 पर्यंत आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत खर्च करण्यात आलेली रक्कम 1 हजार 800 कोटींहून अधिक आहे. 31 मार्च 2024 पर्यंत ठरवलेल्या 22 हजार 810 कोटी रुपयांपैकी फक्त 8 टक्के इतकी आहे. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2020 मध्ये झाली. 1 ऑक्टोबर 2020 ते 30 जून 2021 या कालावधीसाठी ही योजना सुरू केली होती. पण कोरोना महारोगराईच्या दुसर्‍या लाटेमुळे या योजनेचा कालावधी 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आला.

दोन वर्षांपर्यंत सरकारचे अनुदान

पिआत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत दोन वर्षांपर्यंत सरकार अनुदान देईल. ज्या संस्थेत 1000 पर्यंत कर्मचारी आहेत, त्यामध्ये 12 टक्के कर्मचार्‍यांच्या वतीने आणि 12 टक्के कंपनीच्या वतीने केंद्र सरकार देईल. एक हजारहून अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये कर्मचार्‍याचा 12 टक्के भाग केंद्र देईल. 65 टक्के संस्थांचा यामध्ये समावेश असेल. कोरोनातून सावरल्यानंतर रोजगाराच्या संधी वाढवणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. यासाठी सरकार आणि बँकांनी गुंतवणूक केली आहे. ही रक्कम देशाच्या जीडीपीच्या 13 टक्के आहे.

  • मार्च 2022 पर्यंत आणखी 2.56 दशलक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष्य
  • 2.88 दशलक्ष नवीन कामगार

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT