Uncategorized

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर सभेसाठी औरंगाबादेत दाखल; पैठणकडे रवाना, ८ मंत्री सोबत

अनुराधा कोरवी

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी औरंगाबादेमध्ये आगमन झाले. चिकलठाणा विमानतळावर शेकडो समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनीदेखील समर्थकांशी हस्तांदोलन करत त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. त्यानंतर आठ मंत्र्यांसह ते जाहीर सभेसाठी पैठणकडे रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि.१२) रोजी दुपारी १२.३० वाजता चिकलठाणा विमानतळावर येणार होते. परंतु, प्रत्यक्षात ते दुपारी २ १० मिनिटांनी विमानतळावर पोहोचले. त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, दिपक केसरकर, संजय राठोड, अतूल सावे, अब्दूल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे हे मंत्रीदेखील होते. याशिवाय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री भागवत कराड हेदेखील विमानतळावर उपस्थित होते.

हे प्रेम, लोकांचे आशिर्वाद आहेत

मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. शिंदे हे थेट गर्दीच्या जवळ आले. त्यानंतर ते समर्थकांशी हस्तांदोलन करत पुढे चालत होते. या प्रतिसादाबद्दल पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे प्रेम आहे, लोकांचे आशिर्वाद आहेत असे म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT