करमाड(औरंगाबाद), पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसीतील डी- सेक्टरमध्ये वोखार्ड शाळेसमोर रिकाम्या स्कूलबसने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला उडवले. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अजितकुमार उत्तमकुमार रुद्रपाल ( २०, काचर,आसाम, ह.मू. कुंभेफळ ता. औरंगाबाद ), असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज सकाळी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमध्ये अजितकुमार उत्तमकुमार रुद्रपाल आणि इतर दोघे एका बाईकवर (MH 20 FF 03640) जात होते. डी-सेक्टरमध्ये एका शाळेसमोर रस्ता ओलांडताना एका स्कूलबसने (MH 20 EG 7285) बाईकला जोरदार धडक दिली. यात अजितकुमार रुद्रपाल या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी दाखल केले.
अपघातात गंभीर जखमींमध्ये औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथील रहिवासी आकाश अनिल साळवे (25) आणि परराज्यातील एकाचा समावेश आहे. या तरुणांच्या दोन्ही पायांना जबर मार लागला आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
.हेही वाचा