Uncategorized

औरंगाबाद : हाय प्रोफाईल पत्त्याच्या क्लबवर छापा; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

अविनाश सुतार

गंगापूर: पुढारी वृत्तसेवा: औरंगाबाद – नाशिक महामार्गावरील गंगापूर तालुक्यातील दिवशी पिंपळगाव शिवारातील फॉर्म हाऊसवरील पत्त्याच्या क्लबवर छापा टाकण्यात आला. येथील १७ ते १८ जणांकडून तब्ब्ल २५ लाखांची रोकड जप्त केली. तसेच गाड्यांसह १ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज (दि.४) पहाटे शिल्लेगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

दरम्यान, या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालांवरून यामध्ये हीव्हीआयपी राजकीय लोकांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील आलिशान चारचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी असल्याचे सांगितले जात आहे.

ही कारवाई औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे यांनी केली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT