Uncategorized

औरंगाबाद : वाळूज येथे शिर धडावेगळे करून तरुणाचा खून

अविनाश सुतार

वाळूज महानगर : पुढारी वृत्तसेवा : वाळूज एमआयडीसीतील  बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात २० तरुणाचा शिर धडावेगळे केलेला मृतदेह आज (दि.१५) सकाळी आढळून आला. तरुणाचा अमानूष खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्‍याच्‍या  घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसीतील एका बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात तरुणाचा मृतदेह असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, गणेश ताठे, सहायक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुनावत यांनी घटनास्थळी पाहणी केली. २० ते २५ वर्षीय तरुणाचे शिर धारधार शस्त्राने धडावेगळे करून अज्ञात मारेकऱ्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी काटेरी झुडुपे टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना दिसून आले. दरम्यान, फॉरेंन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थळावरुन रक्‍ताचे नमुने जमा केले आहेत.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT