Uncategorized

औरंगाबाद : अजिंठा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

अविनाश सुतार

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : अजिंठा परिसरातील राजणी शेत शिवारातील गोठ्यातील गाईवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना आज (दि. ४) सकाळी उघडकीस आली़. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरातील राजणी शिवारात शेतकरी सुरज मंडावरे (रा.अजिंठा) यांचा गोठा आहे. या गोठ्यात बांधलेल्या गाईच्या मानेवर बिबट्याने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला चढवला. या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली असून याची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे.

दरम्यान, या परिसरात याआधी बिबट्याने हल्ले केल्याचे प्रकार घडले आहेत. यात शेतकरी सुरज मंडावरे यांचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या परिसरात बिबट्यासह तीन पिल्लांचा वावर असल्याचे नागरिकांना दिसून आले आहे. बिबट्याने पुन्हा जंगल क्षेत्र सोडून शेतशिवारात शिरकाव केल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी शेतात जायलाही घाबरत आहेत. तरी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT