Uncategorized

अजिंठा : पिंपळदरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

सोनाली जाधव

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : पिंपळदरी (जि.औरंगाबाद) येथे मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी  शेतकऱ्यांनी केली आहे.

पिंपळदरी शेत शिवारातील गट. क्र. ५१ मध्ये लक्ष्‍मण रामराव कळंत्रे यांनी सांयकाळी गोठ्यात शेळ्या बांधल्या. मध्यरात्रीबिबट्याने बांधलेल्या शेळ्यावर हल्ला चढविला.दोन शेळ्या जागीच ठार झाल्या. या घटनेची माहिती अजिंठा वनविभागाला देण्यात आली आहे.

बिबट्याचे हल्ल्याचे सत्र सुरूच

बिबट्याचा वावर सिल्लोड तालुक्यात पिंपळदरी शिवारात नेहमीचा झाला आहे. वाडी, वस्त्यांवर राहणाऱ्या पशुधनावर बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. पिंपळदरी येथे सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाली. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT