UGC NET Result  
Latest

UGC NET Result : प्रतीक्षा संपली! यूजीसी नेट परीक्षेचा निकाल आज

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : बऱ्याच विद्यार्थ्यांना नेट परीक्षा देऊन शिक्षक बनण्याची इच्छा असते. त्यापैकी तुम्ही एक आहात का? यासाठी नेट परीक्षा दिली आहे का?  तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा 'नेट' (NET-National Eligibility Test ) २०२३ डिसेंबर महिन्यात झाली. तर या परिक्षेचा निकाल आज (दि.१७) लागणार आहे. या बातमीत आपण निकाल कुठे, कसा पाहायचा इत्यादी सर्व तपशीलवार माहिती पाहू. UGC NET 2023

UGC NET Result UGC NET Result : २९२ शहरांमध्ये ८३ विषयांसाठी UGC – NET

युजीसी नेट डिसेंबर परीक्षेचा निकाल आज (दि.१७) जाहीर होईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ६ डिसेंबर २०२३ ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीत ९,४५,९१८ उमेदवारांसाठी देशभरातील २९२ शहरांमध्ये ८३ विषयांसाठी UGC – NET डिसेंबर २०२३ आयोजित केली होती. जर तुम्हाला या परिक्षेसंबधित अधिक आणि अधिकृत माहिती हवी असेल तर तुम्ही युजीसीच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही  हेल्प डेस्क क्रमांक ०११-४०७५९००० / ०११-६९२२७७०० वर कॉल करू शकता आणि माहिती घेवू शकता.

डिसेंबर 2023 चा UGC NET निकाल असा डाउनलोड करा

  • प्रथम UGC NET च्या अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.ac.in. ला भेट द्या
  • मुख्यपृष्ठावर दिलेल्या UGC NET परीक्षा निकाल लिंकवर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला एक नवीन पेज उघडेल
  • येथे तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि दिलेली सुरक्षा पिन प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा  UGC NET 2023 डिसेंबरचा निकाल दिसेल
  • तुम्ही निकाल डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT