Latest

Uddhav Thackeray | सरन्यायाधीशांबद्दल अपमानकारक वक्तव्य, उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांच्या दसरा मेळाव्यातील वक्तव्यामुळे कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. त्यांनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud) यांना उद्देशून केलेले वक्तव्य अपमानकारक असून त्यांचा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांच्या निकालावर परिणाम करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करत दिल्ली येथील एका पत्रकाराने ठाकरे यांच्या विरुद्ध अवमान कारवाई करण्यासाठी पाऊल उचलले आहे. सदर पत्रकाराने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी कायद्यानुसार आवश्यक असलेली परवानगी ॲटर्नी जनरल यांच्याकडे मागितली आहे.

संबंधित बातम्या

घराण्याबद्दल बोलत असताना, ठाकरे यांनी कथितपणे सरन्यायाधीश आणि त्यांच्या वडिलांचा उल्लेख केला. ज्यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणूनही काम केले होते. त्यांनी एखाद्याच्या नावाची नोंद इतिहासात कशी घेतली जावी, याचा संदर्भ भाषणात दिला होता. त्यांनी म्हटले होते की, कोणीतरी जे खंबीरपणे उभे राहिले अथवा कोणीतरी जे सत्तेपुढे झुकले आहे.

सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यासाठी परवानगी मागताना पत्रकार दीपक उपाध्याय यांनी अॅटर्नी जनरल वेंकटरामानी यांना त्यांच्या भाषणाचे इंग्रजी प्रतिलेखन (English transcription) सादर केले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की एका राजकारण्याने अत्यंत अपमानास्पद आणि बदनामीकारक टिप्पणी केली आहे, ज्याचा उद्देश सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे आणि सरन्यायाधीश कार्यालयाला बदनाम करण्याचा आहे. ही त्यांची कृती अवमान करणारी आहे.

"ठाकरेंची (Uddhav Thackeray) टिप्पणी वैयक्तिकरित्या सरन्यायाधीशांना (CJI) लक्ष्य करणारी आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी दबाव आणून हस्तक्षेप करण्याचा आणि सरन्यायाधीशांना विशिष्ट प्रकारे निर्णय घेण्यास भाग पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा न्यायालयाचा अपमान करण्याचा प्रयत्न असू शकतो आणि हा काही पीठांना प्रकरणांची सुनावणी घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यांचे वक्तव्य न्यायालयीन स्वातंत्र्य आणि अखंडतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. कोणत्याही कल्पनेने वाजवी टीका करणे अथवा घटनेच्या अंतर्गत कोणत्याही नागरिकाला दिलेल्या स्वातंत्र्याद्वारे मत व्यक्त करण्याची ही प्रामाणिक अभिव्यक्ती मानली जाऊ शकत नाही," असे उपाध्याय यांनी म्हटले आहे.

ठाकरे यांच्यासारखा कोणीतरी न्यायपालिकेच्या विरोधात असे वक्तव्य करू शकतो हे धक्कादायक असून त्यांनी लोकशाही मूल्ये आणि कायद्यातील नियमाचा आदर केला नसल्याचे त्यांचा दावा आहे.

"ठाकरे यांची कृती न्यायालयाचा अवमान कायद्यांतर्गत परिभाषित केल्यानुसार फौजदारी स्वरूपाचा अवमान (criminal contempt) करणारी आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यास मी तुमची लेखी संमती मागतो." असे उपाध्याय यांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT