संग्रहीत छायाचित्र  
Latest

Argentina : पोटच्या पोरांना कार बाहेर ठेवत आई बॉयफ्रेंडसोबत करत होती ‘असले’ कृत्य, video viral

backup backup

अर्जेंटीना ; पुढारी ऑनलाईन : आपल्या दोन मुलांना कारबाहेर ठेवत एका महिलेने जे काही कृत्य केले ते मन हेलावून टाकणारे आहे. ही घटना अर्जेंटीनाच्या प्लाटामधील पेरेयरा इराओला पार्कमध्ये घडली आहे. प्रियकरासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी त्या महिलेने आपल्या दोन लहान मुलांना कारबाहेर उभे केले. तर, ती स्वतः कारमध्ये तिच्या प्रियकरासोबत रोमान्स करत होती. ही घटना अर्जेंटिनामधीलला प्लाटा येथील परेरा इराओला पार्कमधील घडली. (Argentina)

एल लिटोरल यांच्या वृत्तानुसार, महिलेने मुलांना कारच्या बाहेर थांबण्यास सांगितले. आणि कारचे दरवाजे बंद केले त्याचवेळी ती प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करत होती.

या घटनेचा एक व्हिडिओही समोर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ५ वर्षांची मुलगी तिच्या दोन वर्षांच्या भावासोबत कारबाहेर उभी आहे. आणि दोघेही गाडीच्या आत डोकावण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान मुले खूप आश्चर्यचकित आणि अस्वस्थ ही दिसत आहेत.

Argentina : तो दरवाजा आतून बंद होता

दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या माहितीनुसार, मुले त्यांच्या कारमध्ये डोकावत आहेत आणि त्यांच्या आईला आत घेण्यास सांगत आहेत. पण त्याची आई त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. यादरम्यान मुलांनी कारचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांना तो उघडता आला नाही. कारण तो दरवाजा आतून बंद होता.

यावेळी घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसांनी कारवाई करत त्या महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे. तिचा बॉयफ्रेंड त्या मुलांचा बाप नसल्याचं पोलिसांना नंतर कळलं. त्यानंतर चौकशीत २८ वर्षीय महिलेने सांगितले की, ती काही दिवसांपूर्वीच या व्यक्तीला भेटली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचीही तिने कबुली दिली आहे.

फिर्यादी गॅब्रिएला माटेओ यांनी सांगितले की, या प्रकरणात पुरुषाची जितकी चूक आहे तितकीच त्या स्त्रीची आहे. या दोघांवर मुलांशी गैरवर्तन आणि लैंगिक शोषण केल्याचे आरोप होऊ शकतात.

दोन्ही मुलांना सध्या केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे वकिल म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT