अटक  
Latest

Two Naxals Arrested : एटापल्ली येथे खाणविरोधी रॅलीतून दोन नक्षल्यांना अटक

नंदू लटके

एटापल्ली येथे सुरजागड लोहप्रकल्पाविरोधात २६ ऑक्टोबरला ग्रामसभा कार्यकर्त्यांद्वारे आयोजित रॅलीतून पोलिसांनी दोन नक्षल्यांना अटक केली आहे. ( Two Naxals Arrested )  मुडा मासा झोही (३२) व सैनू दोरपेटी अशी अटक केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. दोघांवर चार लाख रुपयांचे बक्षीस होते.

मुडा झोही हा एटापल्ली तालुक्यातील गोरगट्टा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर चकमकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. सुरुवातीला तो गट्टा दलममध्ये भरती झाला. त्यानंतर तो सशस्त्र दलमचा सदस्य झाला. नक्षल्यांच्या ऍ़क्शन टीमचाही तो सदस्य होता. त्याच्यावर शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

सैनू दोरपेटी हा एटापल्ली तालुक्यातील बोडमेटा येथील रहिवासी आहे. तो जनमिलिशियाचा सदस्य आहे. त्याच्या खुनाचा एक आणि गट्टा पोलिस ठाण्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे. ( Two Naxals Arrested ) शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT