सतेज पाटील  
Latest

कर्नाटकची भूमिका आडमुठेपणाची: पालकमंत्री सतेज पाटील

स्वालिया न. शिकलगार

कोल्हापूर :पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रवाशांना दोन डोस आणि आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्याची कर्नाटक शासनाची भूमिका आडमुठेपणाची आहे. याबाबत कर्नाटक सरकारची पत्रव्यवहार केला जाईल, असे कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी सांगितले.

आंतरराज्य प्रवेशाबाबत राज्याने स्वतंत्र निर्णय घेऊ नयेत, असे यापूर्वीच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कोल्हापूरसह सांगली आणि सोलापूर हे जिल्हे कर्नाटक सीमेवर आहेत. यातील लोकांना दैनंदिन व्यवहारासाठी कर्नाटकात ये-जा करावी लागते. यामुळे कर्नाटक शासनाने केलेली सक्ती जाचक आहे. असेही त्यांनी सांगत याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर महिलांची बदनामी करण्याचा प्रकार जुलैमध्ये ही घडला होता त्यावेळी त्याची दखल केंद्र सरकारने घेतली असती आणि त्याचवेळी कारवाई झाली असती तर असा प्रकार पुन्हा झाला नसता. 'हेट्स पीचेस' चे प्रमाण देशात वाढत आहे. असे प्रकार चुकीचे आहेत. देशाची प्रतिमा मलिन करणारे आहे, असे सांगत याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेल आणि मुंबई सायबर सेल यांनी कारवाई सुरू केली आहे. केंद्र सरकारनेही या प्रकरणी मदत मदत करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आजपासून पंधरा ते अठरा वयोगटातील लसीकरण सुरू करण्यात आले आहेत. हे लसीकरण येत्या १५ दिवसात पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याचा आराखडा तयार केला आहे. महापालिका क्षेत्रातील २८ हजार जणांचे लसीकरण दहा दिवसात पूर्ण केले जाईल.

जिल्ह्याच्या उर्वरित भागात उर्वरित भागात शाळेत जाऊन लसीकरण करण्याचेही नियोजन केले आहे. या वयोगटातील १ लाख ९९ हजार जणांचे लसीकरण केले जाणार आहे. तसेच ज्यांचा पहिला डोस शिल्लक आहे. त्यातील व्याधीग्रस्त तसेच गरोदर महिला वगळता अन्य नागरिकांचे सक्तीने लसीकरण करण्याचाही विचार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT