sukh mhanje nakki kay ast  
Latest

सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरी-जयदीपच्या नात्यात येणार नवं वळण

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेचं कथानक ६ वर्षांनी पुढे सरकलं असून जयदीप-गौरीच्या नात्यात नवं वळण येणार आहे. काही दिवसांपूर्वीच जयदीप-गौरीला कन्यारत्न झालं. शिर्के-पाटील कुटुंबात चिमुकलीच्या आगमनाने आनंदाचं वातावरण होतं. मात्र आपल्या लेकीला शालिनीपासून धोका आहे ही शंका जयदीपला सतावत होती. यामुळेच आपल्या लेकीला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा जयदीपने निर्णय घेतला आहे. जयदीप आपल्या लेकीसोबत नेमका कुठे आहे याची कल्पना कुणालाच नाही. शालिनीने तर जयदीपचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं आहे. गौरीला मात्र जयदीप आणि लक्ष्मी सुरक्षित असल्याचा ठाम विश्वास आहे.

लीपनंतर चिमुकली लक्ष्मी आता मोठी होणार आहे. जयदीप-गौरीच्या लाडक्या लेकीची म्हणजेच लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे बालकलाकार साईशा साळवी. साईशा मुळची पुण्याची. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे. साईशाने अनेक जाहिराती आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम केलं आहे. स्टार प्रवाहच्याच पिंकीचा विजय असो मालिकेतील तिने साकारलेली ओवी सर्वांच्याच आवडीची आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील लक्ष्मी साकरण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. या नव्या टीमसोबत तिची छान गट्टी जमली आहे. साईशा म्हणजेच लक्ष्मी सेटवर सर्वांचीच लाडकी आहे.

तेव्हा सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील लक्ष्मीसोबतचा हा नवा प्रवास अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT