Latest

सिंधुदुर्ग : तिलारी घाटात ट्रकला अपघात; चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Shambhuraj Pachindre

दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : तिलारी घाट उतरत असताना जयकर पॉईंट येथील तीव्र उताराच्या वळणावर मालवाहू ट्रक पलटी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.26) रात्री घडली. यात ट्रकचालक प्रवालिका सुरेश सिटीयाला (३६, रा. तेलंगणा) ही महिला गंभीर जखमी झाली. महिलेला गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तिलारी घाटात वाहनांची वर्दळ वाढली आहे. या घाटातील रस्ता वाहतुकीस सुरळीत असला तरी या घाटातून प्रथमच प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी तितकाच धोकादायक असल्याचे चित्र समोर येत आहे. याशिवाय घाटातील तीव्र स्वरुपाचे उतार व यु टर्नमुळे चालकांचे अंदाज चुकुनं वारंवार अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.

शुक्रवारी रात्री तेलंगणा येथील मालवाहू ट्रक चंदगडहून तिलारी घाटमार्गे गोव्याला जात होता. घाट उतरत असताना जयकर पॉईंट येथील तीव्र स्वरुपाच्या उताराचा अंदाज न आल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटन यु टर्नवरील तुटलेल्या संरक्षक कठड्याला ट्रकची जोरदार धडक बसली.

धडक इतकी जबर होती की ट्रक वाहकाच्या बाजूने जाग्यावरच पलटी झाला. सुदैवाने तो खोल दरीत कोसळण्यापासून बचावला. मात्र ट्रकमधील प्रवालिका सिटीयाला या अपघातातात गंभीर जखमी झाल्या. त्यांना गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सिटीयाला यांचे निधन झाले. तसेच ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT