Latest

त्रिपुरामध्‍ये भाजपची आघाडी, ‘टिप्रा मोथा’ची लक्षणीय कामगिरी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला. राज्‍यात १६ फेब्रुवारी रोजी तब्‍बल ८६.१० टक्‍के मतदान झाले होते. येथील ६० जागांपैकी २८ जागांवर भाजपच्‍या उमेदवारी आघाडी घेतली आहे. दरम्‍यान, राजेशाही घराण्‍यातील प्रद्योत देववर्मा यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेली टिप्रा मोथा पक्ष १३ जागांवर तर सीपीएम १४, काँग्रेस ५ तर अपक्ष एकाजागेवर आघाडीवर आहे. ( Tripura Election Results )

Tripura Election Results 'तिरंगी' लढतीकडे सर्वांचे लक्ष

सलग २५ वर्ष डाव्‍यांनी त्रिपुरामधील सत्ता अबाधित ठेवली होती. मात्र २०१८ विधानसभा निवडणुकीत भाजपने डाव्‍यांचा पराभव करत प्रथम राज्‍यातील विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकविला होता. यंदा भाजप आणि डावे-काँग्रेस आघाडीसह राजेशाही घराण्‍यातील प्रद्योत देववर्मा यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेली टिप्रा मोथा पक्षही निवडणूक रिंगणात होता. या नव्‍या पक्षाने 'ग्रेटर टिपरलँड' या राज्यातील आदिवासींसाठी स्वतंत्र राज्यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याची ग्‍वाही दिली आहे.

विधानसभेच्‍या ६० जागांपैकी भाजप ५५ जागा लढत आहे. तर मित्र पक्ष आयपीएफटीला उर्वरीत जागा दिल्‍या होत्‍या. कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ इंडिया ( एम) ४७ जागा तर काँग्रेस १३ जागांवर लढली. तृणमूल काँग्रेसने २८ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. ६० विधानसभा मतदारसंघांमध्‍ये २५९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

Tripura Election Results : देववर्मांच्‍या 'टिप्रा मोथा' १३ जागांवर आघाडीवर

यंदाच्‍या निवडणुकीत टिप्रा मोथा या नवीन पक्षाने सत्ताधारी भाजपसह काँग्रेस-सीपीआय ( एम) युतीसमोर मोठे आव्‍हान निर्माण केले आहे. त्रिपुराच्या राजेशाही घराण्‍यातील प्रद्योत देववर्मा हे या पक्षाचे प्रमुख आहेत. आदिवासी समाजाचे नेते अशी त्‍यांची ओळख झाली आहे. आपणच राज्‍यात किंगमेकर ठरु, असा दावा ते करत आहेत. विशेष म्‍हणजे २०२१ मध्‍ये झालेल्‍या राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज संस्‍थेच्‍या निवडणुकीत टिप्रा मोथा यांच्‍या पक्षाला घवघवीत यश मिळघले होते. त्‍यांनी ३० पैकी १८ जागा जिंकल्‍या होत्‍या. आता राज्‍यातील विधानसभेच्‍या ६० मतदारसंघांपैकी ३० मतदारसंघ हे आदिवासी बहुल आहेत. टिप्रा मोथा पक्ष हा ४२ जागा लढवल्‍या. राज्‍यात बांगलादेशातील हिंदू स्‍थलांतरितांमुळे स्‍थानिक लोक आपल्‍याच जन्‍मभूमीत अल्‍पसंख्‍यांक झाले आहेत. त्‍यांच्‍या या भूमिकेला स्‍थानिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत होता. त्‍यामुळे यांनी निर्माण केलेल्‍या आव्‍हानाला विरोधी पक्षाला हलक्‍यात घेवून चालणार नाही, असे राज्‍यातील राजकीय विश्‍लेषक स्‍पष्‍ट करत होता. आता निवडणूक निकालात आदिवासी बहुल ३० मतदारसंघांपैकी १३ ठिकाणी देववर्मा यांचा पक्ष आघाडीवर आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT