

पुढारी ऑनलाईन: मेघालयमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला आज (दि.०२) होत आहे. ६० विधासभा मतदारसंघातील ५९ जागांसाठी मतदान झाले होते. मेघालयातील २१.६ लाख मतदारांपैकी ८५.२५ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मेघालयात 13 ठिकाणी (12 जिल्हा मुख्यालय आणि 1 उप विभाग) कडक सुरक्षेसह मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पहिल्या फेरीत पोस्टल बॅलेट मतांची मोजणी सुरू आहे. या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी), कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात स्पर्धा असणार आहे.