Latest

Toyota Hycross : टोयोटाची नवी इनोव्हा हायक्रॉस लॉन्च; जाणून घ्‍या फीचर्स आणि किंमत

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : टोयोटा किर्लोस्कर मोटरने आज ( दि. २८)  इनोव्हाचे हायक्रॉस (Toyota Hycross) हे नवीन हायब्रिड मॉडेल लाँच केले. या कारची किंमत १८.३० लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल, अशी माहीती कंपनीकडून देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात या कारचे अनावरण करण्यात आले होते. जानेवारीपासून या कारची डीलरशिप उपलब्ध होईल, असेही कंपनीने स्‍पष्‍ट केले आहे.

कंपनीने नवीन MPV इनोव्हा हायक्रॉस कारची (Innova HyCross) सुरुवातीची किंमत 18.30 लाख रुपये ठेवली आहे. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 28.97 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वीच नव्या कारसाठी ५० हजार रुपये भरुन बुकिंग सुरू केले होते.

पेट्रोल आणि हाइब्रिड अशा दोन्ही पर्यांमध्ये

ही कार दोन पॉवरट्रेनसह उपलब्ध असेल, यामध्ये पेट्रोल आणि हाइब्रीड अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यातील G आणि GX या ट्रिम्समध्ये पेट्रोल इंजिन पर्याय मिळेल. तसेच सेल्फ चार्जिंग हायब्रिड प्रकारामध्ये ZX(O), ZX आणि VX असे तीन पर्याय उपलब्ध असतील. तसेच या नव्या कारमध्ये 7 सीटर आणि 8 सीटर अशा पर्यायांमध्ये देखील पाहायला मिळतील.

हायक्रॉस या MPV कारला SUVचा लुक

टोयोटाची इनोव्हा हायक्रॉस ही कार SUV कारच्या डिझाइनचा लुक दिलेला आहे. यामध्ये होक्सागोलन ग्रील, फॉर्च्युनर  सारखे हेडलँप,, हॉरिझन्टल डे-टाइम रनिंग लँप, चारी बाजूंनी बॉडी क्लॅडिंगने सुसज्ज अशी ही कार असेल. क्रिस्टा कारसारखी ग्लासहाऊस देखील याला दिलेली आहे. कारच्या मागील बाजूस रुफ माऊंटेड स्पॉइलर (वरील बाजूस लाईट), एल ई डी टेल लाईट्स अशा फिचर्स यामध्ये असतील.

हायक्रॉस कारचे एलईडी टेल-लाइट्स हे फिचर

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT