Tom Holland-Zendaya  
Latest

Tom Holland-Zendaya in Munnar : केरळच्या मुन्नारमधून हॉलीवुड स्टार्सचे फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत स्पॉट झाल्यानंतर हॉलीवूड स्टार टॉम हॉलंड आणि जेंडाया यांनी मुन्नार गाठले. (Tom Holland-Zendaya in Munnar) केरळच्या मुन्नारमधून एकमेकांचा हातात हात धरलेला या कपलचा फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर म्हटले जात होते की, दोघे नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनासाठी मुंबईत आले होते. (Tom Holland-Zendaya in Munnar)

केरळ पर्यटनाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर दोघांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये शनिवारी हॉलंड आणि जेंडयाचा एक फोटो पाहायला मिळतो. ते मुन्नारच्या हिरव्यागार ठिकाणी मधोमध उभे असलेले दिसतात. या फोटोला कॅप्शन लिहिलीय की – Guess who we spotted far away from home? #FarAwayHome #Munnar #KeralaTourism

या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केलीय. एका युजरने लिहिलं- 'संपादकाला सलाम.' दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय-चांगला प्रयत्न आहे. आणखी एकाने म्हटलंय-एप्रिल फर्स्ट हिट मुन्नार!!

काहींनी जेंडाया आणि टॉमचा फोटो शेअर केला आहे. हे दोघे मुंबई विमानतळावरून बाहेर पडले होते, त्यावेळचा हा फोटो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT