Latest

Margashirsha Purnima 2022 : सर्व समस्यांतून मुक्त होण्यासाठी जाणून घ्या मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्व आणि व्रत कसे करावे?

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Margashirsha Purnima 2022 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला मोठे महत्व आहे कारण मार्गशीर्ष महिना म्हणजे स्वतः भगवान श्रीक्रृष्ण आहे, अशी मान्यता आहे. कारण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता ज्ञान देताना स्वतःच म्हटले होते, की "वेदांमध्ये मी सामवेद आहे, ऋषीमंध्ये नारद आहे, मुनींमध्ये कपिल आहे, झाडांमध्ये मी पिंपळ आहे. ऋतूंमध्ये वसंत आणि महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे. मासानाम मार्गशीर्षोहम्," असे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिना, हा जप-तप व्रत वैकल्य करून पापक्षालन करण्याचा तसेच पुण्य करण्याचा मानला जातो.

Margashirsha Purnima 2022 : तसेच मार्गशीर्ष पौर्णमेला फार मोठे महत्व आहे. अशी मान्यता आहे की मार्गशीर्ष पौर्णिमेला जो संपूर्ण श्रद्धा भक्ती भावाने व्रत करतो त्याला त्याच्या या आयुष्यातील सर्व दुःख आणि समस्यांमधून मुक्ती तर मिळतेच तसेच गतजन्मीचे देखिल सर्व पाप नष्ट होऊन याच जन्मात मोक्ष प्राप्त होते. चला, जाणून घेऊया पौर्णिमेची तिथी, व्रत आणि पूजा विधी

Margashirsha Purnima 2022 : या वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा 7 डिसेंबरला येत आहे. 7 डिसेंबरला सकाळी 8 वाजून 1 मिनिटांनी पौर्णिमा तिथीला प्रारंभ होत आहे. तर त्याच्या पुढील दिवशी 8 डिसेंबरला सकाळी 09 वाजून 37 मिनटांनी याचे समापन होईल. त्यामुळे पौर्णिमेचे व्रत करणा-यांनी व्रताचे समापन रात्री 12 वाजता किंवा त्यानंतर लगेचच करू नये. दुस-या दिवशी 8 डिसेंबरला 9 वाजून 37 मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे त्यानंतरच व्रताचे समापन करावे.

Margashirsha Purnima 2022 : मार्गशीर्ष पौर्णिमा व्रत आणि पूजा विधी

पौर्णिमा सुरू होण्यापूर्वी पहाटे लवकर उठून स्नानादी कार्य करून घ्यावे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करून व्रताचे संकल्प करावे.

स्नानानंतर श्वेत वस्त्र धारण करून आचमन करावे

नंतर ॐ नमोः नारायण असा जप करून श्री हरि भगवान विष्णू अर्थात भगवान श्रीकृष्णांचे आवाहन करावे

त्यानंतर भगवंतांना आसन, गंध पुष्पादि अर्पण करावे

पूजा स्थळी वेदी बनवून हवन करण्यासाठी त्यामध्ये अग्नि पेटवावा

नंतर हवनात तूप, आदिंची आहुती द्यावी

हवन समाप्त झाल्यावर संपूर्ण मनाने भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करावे, ध्यान करावे

नंतर पौर्णिमा संपेपर्यंत केवळ फळाहार करून व्रत करावे

व्रत समापनापूर्वी आपल्या शक्तीप्रमाणे गरीबांना भोजन करवून दान-दक्षिणा द्यावी. नंतरच उपवास सोडावा.

मार्गशीर्ष पौर्णिमेचे हे व्रत अत्यंत फलदायी आणि महत्वाचे मानले गेले आहे. कारण या पौर्णिमेला संपूर्ण मोक्षदायिनी पौर्णिमा म्हटले आहे.

यादिवशी दानधर्म केल्याने 32 पट अधिक पूण्य प्राप्त होते.

Margashirsha Purnima 2022 : चंद्र पूजनाचे महत्व

मार्गशीर्ष पौर्णिमेचे व्रत करून रात्री पूर्ण चंद्र निघाल्यावर चंद्राला दूध आणि अर्घ्य देऊन त्याची पूजा करावी. तसेच कच्च्या दूधात मिश्री आणि तांदूळ मिसळून अर्घ्य द्याव. यामुळे मानसिक शांती प्राप्त होते, आयुष्यातील सर्व कष्टांचे निवारण होऊन धन-संपत्तीत वृद्धी होते. सोबतच चंद्र देवाची ही कृपा होते आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT