Latest

Tiger counting : रत्नागिरीत आजपासून व्याघ्र गणना

backup backup

रत्नागिरी/सावंतवाडी ; हरिश्चंद्र पवार : जंगलामध्ये वाघांची संख्या नेमकी किती आहे, या संख्येमध्ये किती वाढ झाली आहे, याबाबतची माहिती मिळवण्याकरिता दर चार वर्षांनी होणारी व्याघ्रगणना यावर्षी 15 ते 21 जानेवारी यादरम्यान होणार आहे. (Tiger counting)

एकूण पाच जिल्ह्यांमध्ये ही व्याघ्रगणना होणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. यासाठी सिंधुदुर्ग वन विभागाने पथके तयार केली आहे. ही पथके दर दोन कि.मी.च्या जंगल परिसरामधील निरीक्षणे नोंदवणार आहेत.

वाघांसह मांसभक्षी, तृणभक्षी तसेच त्यांच्या अधिवासाचे संनियंत्रण करण्यासाठी ही भारतीय ग्रह प्रगणना आयोजित केली आहे. ही गणना संपूर्ण देशभरामध्ये होणार आहे.

5 व्याअखिल भारतीय व्याघ्र प्रगणना- 2022 मध्ये सर्वसाधारण रूपरेषा आणि क्षेत्रीय स्तरावरून माहिती संकलित करावयाची असून याबाबतचे प्रशिक्षण तत्कालीन मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक रवीकिरण गोवेकर यांनी दिले आहे. याशिवाय नागपूर येथील पेच व्याघ्र प्रकल्पात इलही कार्यपद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.

दर 4 वर्षांनी भारतभर, मुख्यतः व्याघ्र राज्यामध्ये ही कार्यपद्धती राबवली जाते. राज्याचे वन विभाग, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था हे संयुक्तपणे हा कार्यक्रम राबवतात.

एकूण पाच जिल्ह्यांमध्ये ही व्याघ्रगणना होणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. व्याघ्र प्रकल्प प्रादेशिकतेच्या 428 बीट आणि राधानगरीच्या 33 व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या 56 बीट मिळून 517 बीट या कामी सज्ज करण्यात आले आहेत.

बीटामध्ये अचूक व प्रामाणिकपणे माहिती नोंदविली तरच हे सर्वेक्षण यशस्वी होईल. त्यादृष्टीने सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी स्थानिक पथकांना प्रशिक्षण दिले आहे.

Tiger counting : 15 ते 21 असे सहा दिवस ही वन्य प्राणी व व्याघ्रगणना

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक सर्जेराव सोनावडेकर,इस्माईल जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी, आंबोली तसेच कडावल, कणकवली, कुडाळ वनक्षेत्रपालांच्या जंगल परिसरात वन्य प्राणी गणना केली जाणार आहे.

15 ते 21 असे सहा दिवस ही वन्य प्राणी व व्याघ्रगणना केली जाणार आहे आणि याबाबतचा अहवाल वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक समाधान चव्हाण आणि क्षेत्र संचालकांकडे सादर केला जाणार आहे.

व्याघ्रगणनेचा हेतू व्यापक

या पद्धतीचा उद्देश केवळ वाघांची संख्या निश्चित करणे नसून मोठ्या भूप्रदेशावरील (ङरपवीलरशि) वाघ, बिबटे, इतर मांसभक्षी प्राणी, तृणभक्षी प्राणी तसेच त्यांचे अधिवास व त्याचप्रमाणे प्राणी कुठे, कसे आणि किती आढळतात, त्यांचा वावर, व्याप्ती आणि भ्रमण मार्ग यांचा अभ्यास करणे हा देखील आहे.

नियत क्षेत्र (इशरीं) स्तरावरून गोळा होणार्‍या माहितीच्या आधारे मोठ्या भूप्रदेशस्तरावर (ङरपवीलरशि ङर्शींशश्र) परिपूर्ण माहिती संकलित केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT