टूथब्रश  
Latest

टूथब्रश इतक्‍या दिवसानंतर फेकून द्या, अन्यथा दात फक्‍त किडणारच नाहीत तर…

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन टूथब्रश वापरताना तो केंव्हा बदलावा हेही माहिती असण गरजेचं आहे. दातांच्या स्‍वच्छतेसाठी प्रत्‍येकजण टूथब्रशचा वापर करतो. काही लोकांना ब्रशचा वापर नीट करता येत नाही. काही लोक जास्‍त वेळपर्यंत ब्रशने दात घासत बसतात. असे करण्यामुळे दातांच्या आरोग्‍यावरही त्‍याचा विपरीत परिणाम होउ शकतो. अशा प्रकारे दात घासल्‍यामुळे दात स्‍वच्छ न होता इन्फेक्‍शनचा धोका उद्भवू शकतो. त्‍यामुळे किती दिवसांच्या वापरानंतर ब्रश फेकून द्यावा आणि नवीन ब्रश घ्‍यावा याची माहिती असणं गरजेच आहे.

किती दिवसानंर टूथब्रश बदलावा

American Dental Association च्या माहितीनुसार दर तीन महिन्यानंतर टूथब्रश बदलणे गरजेचे आहे. तीन महिने ब्रशचा वापर केल्‍यानंतर त्‍याचे ब्रिशल्‍स तुटतात. यामुळे आपल्‍या दातांच्या स्‍वच्छतेसाठी निरूपयोगी ठरतो. याशिवाय तो बॅक्‍टेरियल इंन्फेश्नचेही कारण ठरतो. कारण काळानुसार आपल्‍या टूथब्रशवर किटाणू जमा होत असतात. यामुळे आपल्‍या मौखीक आरोग्‍याच्या अनेक आजारांचे ते कारण ठरू शकते.

तीन महिने ब्रश बदलला नाही तर काय होईल?

जर तुम्‍ही ३ महिने आपला दात घासण्याचा ब्रश बदलला नाही तर, तुमच्या टूथब्रशच्या ब्रिसल्‍स मध्ये बॅक्‍टेरिया आणि फंगस वाढतील. यासोबतच काही फंगल इंन्फेक्‍शनची समस्‍याही निर्माण होउ शकते.

इतकेच नाही तर, आपला टूथब्रश योग्‍य प्रकारे ठेवण्याबाबतही जाणून घेणं गरजेचं आहे. जसं की आपला टूथब्रश अन्य टूथब्रश पासून दूर आणि सरळ ठेवावा. या दरम्‍यान तो स्‍वच्छ धुणे, सुखवणेही गरजेचं आहे. इतकेच नाही तर, प्रवासादरम्‍यान आपला टूथब्रश वरच्या बाजुने कॅप लावून झाकून ठेवावा, जेणेकरून तो घाण होणार नाही, आणि इन्फेक्‍शनचे कारणही ठरणार नाही.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT